‘राष्ट्र समाचार’ डिजिटल आवृत्तीचा प्रथम वर्धापन दिन व संपादक माऊली भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

‘राष्ट्र समाचार’ डिजिटल आवृत्तीचा प्रथम वर्धापन दिन व संपादक माऊली भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 20 :पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील निर्भीड पत्रकारितेचा चेहरा बनलेले न्यूज पोर्टल आणि डिजिटल आवृत्ती ‘राष्ट्र समाचार’ चा प्रथम वर्धापन दिन सोहळा दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे, याच दिवशी राष्ट्र समाचारचे संपादक माऊली उर्फ किसन भोसले यांचा वाढदिवस असल्याने दुग्धशर्करा योग साधत केक कापून त्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
मान्यवरांची मांदियाळी
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शिलेंद्र मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे, सदस्य अनिल वडघुले, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे आणि नगरसेवक राहुल कलाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्याचा गौरवकेवळ पत्रकारिताच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही माऊली भोसले यांचा मोठा दबदबा आहे. ते शहरात हातगाडी पथारी पंचायतचे निवडून आलेले सदस्य असून त्यांच्या जनसंपर्काची प्रचिती या कार्यक्रमातून आली.
याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खालील महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला:यशोधरा महिला बचत गट,सदगुरू महिला बचत गट,भाग्यश्री महिला बचत गट,रणरागिणी महिला बचत गट,पर्यावरण रक्षणाचा संदेश देत माऊली भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित माता-भगिनींना वृक्ष रोप देऊन सन्मानित करण्यात आले.उपस्थित मान्यवर आणि हितचिंतककार्यक्रमाला विठ्ठल दादा गायकवाड (समन्वयक, रमाई स्मारक), दादाराव आढाव, सयाजी भांदिगरे महाराज, मल्हारी भाऊ काळे, हिरुभाऊ शिंदे, रमेशजी भोसले, मारुती बाणेवार, नरेश सोंडकर, महावीर जाधव, प्रा. दत्तात्रय इंगळे, संतोष कसबे, कवी आकाश सोनवणे यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.
“राष्ट्र समाचारने वर्षभरात लोकांचा विश्वास संपादन केला आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”— माऊली भोसले (संपादक)
कार्यक्रमाची सांगताकार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक माऊली भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन विनय सोनवणे यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गायक सुनील म्हस्के यांनी सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. शेवटी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.