Uncategorized

थरकाप! थेरगावमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या !

काळेवाडी पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या!

काळेवाडी/थेरगाव (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी परिसरात गुरुवारी रात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. प्रेमप्रकरणाच्या वादातून दोन तरुणांवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुभान हमीद शेख (वय १९, रा. रहाटणी) याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना मुलीच्या आईचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून मुलीच्या आईच्या ओळखीचा असलेला विशाल सूर्यवंशी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. “मुलीचा नाद सोडून दे” असे विशालने सुभानला बजावले होते. याच वादाचे रूपांतर गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण हाणामारीत झाले.

समाज माध्यमांशी माहिती देताना

थेरगावमधील शिवशंकर कॉलनी येथील चायनीज सेंटर आणि श्रीकृष्ण दूध डेअरीसमोर विशाल सूर्यवंशी व अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभान शेख आणि त्याचा मित्र अर्षद रमजान शेख (वय २१) यांच्यावर चाकू आणि चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात सुभानच्या मानेवर, पोटावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अर्षद शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांची वेगवान कारवाईघटनेचे गांभीर्य ओळखून काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

आपल्या मुलाला गमावलेल्या मातेने दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भररस्त्यात घडलेल्या या हत्येमुळे थेरगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button