Uncategorized
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन प्रभारी अधिकाऱ्यांचा सत्कार

बार्शी प्रतिनिधी दि. १२ : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेश माने साहेब यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.भोईंजे गावच्या पोलीस पाटील श्रीमती ललिता मुसळे यांनी माने साहेबांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी त्यांनी साहेबांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.माने साहेबांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे काम उत्तमरीतीने पार पडेल आणि पोलीस-प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.