पिंपरी-चिंचवडमध्ये पथविक्रेत्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण

प्रल्हाद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला हॉकर्स महासंघ आक्रमक
पिंपरी प्रतिनिधी दि. १८ : पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १८ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शहरातील पथविक्रेते, फेरीवाले आणि गटई कामगारांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.
महानगरपालिकेकडून पथविक्रेत्यांवर होणाऱ्या अतिक्रमण कारवाया, साहित्य जप्ती आणि दंडात्मक निष्कासनाच्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणीही करण्यात आली.
प्रमुख मागण्या अशा
पथविक्रेत्यांवरील अतिक्रमण कारवाया थांबविण्यात याव्यातपथविक्रेत्यांना ओळखपत्र व अधिकृत परवाने तात्काळ देण्यात यावेत
पक्क्या स्वरूपाचे गाळे उपलब्ध करून द्यावेत
पथविक्रेता महाराष्ट्र योजना २०१४ ची प्रभावी अंमलबजावणी करावीअधिकृत जागांचे वाटप करून स्थिर व्यवसायाची संधी द्यावी
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हॉकर्स झोनला प्राधान्य द्यावे
गटई कामगारांना सध्याच्या ठिकाणी अधिकृत स्टॉल द्यावेत
उर्वरित पथविक्रेत्यांचा सर्वे तातडीने पूर्ण करावाया आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले, अनिल दादा गायकवाड, हिंदू मातंग युवा नेतृत्वाचे धर्मराज साळवे, सामाजिक कार्यकर्ते अखिल भाई मुजावर, पथविक्रेता समिती सदस्य माऊली भोसले, मारुती निंबाळकर, बाबासाहेब कांबळे, सुधाकर इंगळे उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे शहर उपाध्यक्ष विकी वाघमारे यांच्यासह मल्हार काळे, मनोहर सोनटक्के, बाबासाहेब हनवते, युवराज तीटकारे, विष्णू सातपुते, विशाल साबळे, गणेश आहेर, रवी ठाकूर, हिरानंद जाधव, युवराज भास्कर आणि माऊली बोराटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते