Uncategorized

मृत्यूचा सापळा ठरणार का? गेटर आलेल्या टायरवर धावतेय बार्शी आगाराची बस; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

oplus_2097184

बार्शी (प्रतिनिधी)दि. १ : बार्शी आगाराची एमएच 14 एलएक्स 5066 क्रमांकाची बस पुढील टायरला गेटर (फुगवटा) आलेल्या अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या धोकादायक स्थितीमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, बस बार्शीपर्यंत सुखरूप पोहोचेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसच्या पुढील टायरवर स्पष्टपणे गेटर दिसत असून प्रवासादरम्यान टायर फुटण्याचा धोका नाकारता येत नाही. विशेषतः वेगात धावणाऱ्या बसमध्ये अशा प्रकारचा दोष जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात धोकादायक स्थितीतील बस रस्त्यावर कशी धावते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बसची तपासणी करावी व प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.”प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा वेळापत्रक महत्त्वाचे की जीव?” असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

oplus_2097184

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button