Uncategorized

वाकडमध्ये २ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला घेतले ताब्यात

पिंपरी प्रतिनिधी दि. ८ : शासनाने प्रतिबंधित केलेला आणि आरोग्यास घातक असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका इसमाला वाकड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.आरोपी: किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय ३२, रा. वाकड, पुणे).

कारवाई: वाकड येथील कस्पटे वस्ती रोडवरील एका पत्र्याच्या चाळीत आरोपी प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ₹ २,०८,६१०/- किमतीचा पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तपास अधिकारी: सपोनि दराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button