Uncategorized

नवनिर्वाचित महापौरांचा भव्य सत्कार सोहळा सोमवारी निगडीत

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मान्यवरांची उपस्थिती; विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी २९ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित महापौरांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी सायं. ५ वाजता ग. दि. माडगूळकर सभागृह, प्राधिकरण-निगडी येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. मंजुषाताई दिपक नागपुरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. रवि बाबासाहेब लांडगे तसेच उपमहापौर मा. सौ. शर्मिलाताई बाबर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

समारंभ परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, अयोध्या) यांच्या शुभहस्ते पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन आशिष दामले (अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ) हे राहणार आहेत.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. श्री. अश्विनीकुमार चौबे, विधानसभा उपसभापती मा. श्री. अण्णा बनसोडे, खासदार मा. श्री. श्रीरंगआप्पा बारणे, डॉ. गोविंद कुलकर्णी (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ), श्रीकांत बडके (सीएमडी, बेलराईस ग्रुप) तसेच त्रित्रिकम जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष, ब्रह्मोद्योग) उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मोहिनीताई पत्की (राष्ट्रीय महिला अध्यक्ष), आमदार शंकरभाऊ जगताप, निखिलजी लातूरकर (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), उमाताई खापरे, महेशदादा लांडगे आणि अमितजी गोरखे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button