Uncategorized

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अर्बन महिला सेल’चा सामाजिक उपक्रम!

चिखलीतील पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा विशेष सन्मान

पिंपरी (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेलच्या वतीने स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. चिखली पोलीस ठाणे येथे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण अभिवादन करत, समाजात उल्लेखनीय सेवा देणारे पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला.​

पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा यथोचित सन्मान!​कार्यक्रमादरम्यान चिखली पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव सर तसेच महिला सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी दीपमाला लोहकरे मॅडम यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

​तसेच, स्व. दादांच्या विचारांतून प्रेरणा घेत आरोग्यविषयक जनजागृती व समाजसेवेत मोलाचे योगदान देणारे हॉस्पिटलचे संस्थापक राहुल तीलवानी यांच्या सहकार्याने:​डॉ. रामश्याम अगरवाल​डॉ. प्रवीण भोसले​डॉ. शुभम पवार​डॉ. स्नेहल रोमन गटकळ​या सर्व डॉक्टरांचा राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने शाल, श्रीफळ, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.​राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती​या प्रसंगी अर्बन सेल महिला शहराध्यक्षा सौ. मनीषाताई गटकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शकरूला पठाण (सय्यद भाई), पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजयाताई काटे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषाताई जढर, निरीक्षक मिराताई कुदळे, निरीक्षक लताताई ओव्हाळ आणि समन्वयक शोभाताई आवटी आदी मान्यवर उपस्थित होते.​

उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “अजितदादांच्या समाजाभिमुख नेतृत्वाचा आणि विकासाच्या विचारांचा वारसा असाच पुढे चालवत राहू,” असा निर्धार व्यक्त करत स्व. दादांच्या नेतृत्वाला मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button