Uncategorized

८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काळेवाडीत देशभक्तीचा जागर

नवनाथ नढे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

काळेवाडी (प्रतिनिधी) दि. १९ : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त काळेवाडी येथील विष्णूराज मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. नवनाथ दादा नढे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी स्वीकृत नगरसेवक नवनाथ नढे पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली.​उपस्थित सर्व नागरिक व मान्यवरांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.​

देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी : नवनाथ नढे पाटीलउपस्थितांना संबोधित करताना नवनाथ नढे पाटील म्हणाले, “असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, समर्पण आणि बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यदिन हा केवळ औपचारिक ध्वजारोहणाचा दिवस नसून देशप्रेम, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करणे हीच खरी देशसेवा ठरेल.”​

मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्यास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:​ बजरंग नढे, हनुमंत सुतार, अनिल शेळके, ॲड. प्रमोद नढे पाटील, तानाजी नढे, नानासाहेब गरड, राहुल सर, धनराज जंजाळे, आदित्य माहुलकर, अविनाश तांबे​संत बाळूदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ​फ्लिपकार्ट व इन्स्टा कार्ड कंपनीचे सर्व कर्मचारी वर्ग​

सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेमाचा नवा संदेश देत हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button