
पिंपरी (प्रतिनिधी):दि. ३१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रविवारी (दि. ३१ मे) त्यांना अभिवादन करण्यात आले. मोरवाडी चौक येथील अहिल्यादेवींच्या स्मारकास आणि खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
सकाळी १०:३० वाजता मोरवाडी चौक, पिंपरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे शहराध्यक्ष श्री. योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी शासन पद्धतीचा गौरव केला.

मान्यवरांची उपस्थिती:
या प्रसंगी माजी सभापती तथा कार्याध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश सेवादल निरीक्षक प्रमोद साळवे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी उपस्थित होते.
यासोबतच उपाध्यक्ष संपद पाचुंदकर, अकबर मुल्ला, सेवादल भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रवीण पिंजन, सामाजिक न्याय विभाग वरिष्ठ उपाध्यक्ष कुमार कांबळे, सचिन गायकवाड, सुनील आडागळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते