Uncategorized

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव – योगेश बहल

पिंपरी प्रतिनिधी , दि. ११ (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात तसेच पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना योगेश बहल म्हणाले की, “कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नसून चातुर्वर्ण्य व जातिभेद ही मानवनिर्मित व्यवस्था आहे. मात्र या विश्वाची निर्मिती करणारी एक अदृश्य शक्ती आहे, असा फुले यांचा विचार होता. मानवाने गुण्यागोविंदाने राहावे आणि ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.”

ते पुढे म्हणाले की, भारतीय समाजातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि ‘सत्यशोधक समाज’चे संस्थापक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.यावेळी माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अशा या महान क्रांतीसूर्याला त्यांनी विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, नगरसेविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शक्रुल्ला पठाण, दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, दिलीप पानसरे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, सरचिटणीस राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, युवक शहर संघटक स्वराज शिंदे, सरचिटणीस राजू चांदणे, गणेश गायकवाड, कुमार कांबळे, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button