Uncategorized

वाकडकरांनो लक्ष द्या! मानकर चौक ते छत्रपती चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद.

कामाचा वेग वाढवण्यासाठी वाहतूक मार्गात मोठा बदल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २२ : वाकड परिसरातील अत्यंत वर्दळीच्या मानकर चौक ते छत्रपती चौक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील या मुख्य रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. त्यानुसार, मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

​नेमके कारण काय? छत्रपती चौकाकडून मानकर चौकाजवळ असलेल्या सोनिगरा सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे सिमेंट काँक्रीटीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, सोनिगरा सोसायटी ते थेट मानकर चौक या टप्प्यातील रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. चालू कामाच्या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने कामात मोठा अडथळा निर्माण होत असून परिसरात दररोज भीषण वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि काम जलद गतीने संपवण्यासाठी हा मार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​

पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी-चिंचवड यांच्या अधिसूचनेनुसार हा वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे.​

असे असतील पर्यायी मार्ग

१: मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणारी वाहने पुढे कस्पटे कॉर्नर चौकातून आपल्या इच्छित स्थळाकडे वळवण्यात आली आहेत.​पर्याय.

२: मानकर चौकातून यू-टर्न (U-Turn) घेऊन वाहने कस्पटे चौक मार्गे पुढे जाऊ शकतील.​

कामाचा दर्जा आणि वेग राखण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य, ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय) सुनील शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button