Uncategorized

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार हक्काचे घर.

यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात ८ वारसांना मोफत सदनिका वाटपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला आहे. या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन) प्रकल्पात मोफत सदनिका वाटप करण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.​

८ वारसांना सदनिकांचे वाटप; एकाची कागदपत्रे प्रलंबित

महापालिका सभेने २ सप्टेंबर २०२६ रोजी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रस्तावानुसार, एकूण ९ मृत कर्मचाऱ्यांपैकी ८ जणांच्या कायदेशीर वारसांना सदनिका देण्याचा आदेश काढण्यात आला आहे.​

सदनिका मिळणाऱ्या लाभार्थ्यांची नावे (मृत कर्मचारी आणि वारस) •:​राहुल धोंडिबा गायकवाड : पत्नी अश्विनी राहुल गायकवाड

•​महेश सुरेश कुंभार : पत्नी शिवुबाई महेश कुंभार​

• अक्षय राजू सावंत : पत्नी हर्षदा सुरेश बने​

• वामन दगडू कसबे : पत्नी सुनीता वामन कसबे​

• सनी अशोक माने : पत्नी कांचन सनी माने​

• सुनील भारत कोरके : पत्नी पल्लवी सुनील कोरके

​• भावेश मोहन वाणी : पत्नी मोहिनी भावेश वाणी​रणजित जयवंत पाटील : आई छाया जयवंत पाटील.

​या दुर्घटनेतील मृत कर्मचारी नागेश गायकवाड यांच्या वारसांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांनाही सदनिका वाटप करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यापूर्वीच महापालिकेने या सर्व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित केले आहे.

​”मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी महापालिका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आर्थिक मदतीसोबतच त्यांना हक्काचा कायमस्वरूपी निवारा देऊन पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​”दुर्घटनेतील ९ पैकी ८ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात सदनिका वाटपाचे आदेश जारी झाले आहेत. एका कर्मचाऱ्याच्या वारसांची कागदपत्रे अद्याप अपूर्ण आहेत. लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागामार्फत त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येईल.”— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button