Uncategorized

भोईजे गावच्या सुपुत्राचा बार्शीत भव्य गौरव.

‘बार्शीचे मानबिंदू’ पुस्तकात श्री. शंकर इंदुमती गोरख कवठे यांच्या यशोगाथेचा समावेश!

बार्शी (प्रतिनिधी) दि. १७ : बार्शीच्या मातीतील ज्या सुपुत्रांनी आपल्या जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत उच्च पदे गाठली, अशा कर्तृत्ववान राजपत्रित अधिकाऱ्यांचा गौरव करणारा ‘बार्शीचे मानबिंदू’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या बार्शीतील राजपत्रित अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी यशाची गाथा या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आली आहे.

​या सन्माननीय यादीत भोईजे गावचे सुपुत्र श्री. शंकर इंदुमती गोरख कवठे यांचाही विशेष समावेश करण्यात आला असून, सोहळ्यात त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांचा आणि ग्रामीण मातीचा वारसा जपत त्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाचा केवळ बार्शी तालुक्यालाच नव्हे, तर संपूर्ण भोईजे गावातील ग्रामस्थांनाही सार्थ अभिमान आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा या पुस्तकात विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली आहे.

​बार्शी तालुक्याने आजवर अनेक नामवंत अधिकारी, प्रशासक आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज घडवले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा, या उद्देशाने ‘बार्शीचे मानबिंदू’ या दर्जेदार कॉफी टेबल बुकची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आणि उपस्थित राजपत्रित अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.​

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक, भोईजे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, हे पुस्तक बार्शी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ऊर्जास्रोत ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button