भोसरीत मोबाईल चोरस अटक
भोसरी १८ (HRNM)रस्त्याने चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाइल हिसकावलारस्त्यावरून जात असलेल्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना भोसरीतील सहल केंद्र, अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चोरट्याला अटक केली आहे.याप्रकरणी रेहान सोहराब अन्सारी तौसिफ (१८, गुळवे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर धर्मेंद्र सूर्यवंशी (च-होली फाटा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासह घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोटोरोला कंपनीचा लाल रंगाचा मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि पळून गेला. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेतला आणि मयूर सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.