बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अकोले: ९(HRNM)तालुक्यातील पांगरीयेथे बालविवाह होणार असल्याची माहिती असूनही गावच्या पोलिस पाटलाने पोलिसांना कळविले नाही. या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील यांचे तातडीने निलंबन कण्यात यावे. त्यांच्यावर सेवानियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश महाराष्ट्र महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी दिले आहेत. तसे त्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी आदेशाद्वारे कळविले आहे.सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि पत्रकार श्रीनिवास रेणुकदास यांनी पांगरी बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगा कडे लेखी मेलद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना चौकशीचे आदेश दिलेहोते आणि सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर महिला आयोगाने काल या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या निलंबनाची कार्यवाही करण्यास सांगितली. राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी आदेश दिले आहेत.संबंधितावर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ व लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा सदर गावचे पोलीस पाटील यांची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही व्हावी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील यांचे निलंबन करून सेवानियमानुसार कार्यवाही करावी व महिला आयोगाला कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.