Uncategorized

म्हाळुंगे येथे जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवून तोडफोड.

४० ते ५० जणांच्या टोळक्यासह दोघांवर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल!

बावधन / पुणे प्रतिनिधी दि. ३० : म्हाळुंगे परिसरातील सर्व्हे नंबर ९/१० मधील मिळकतीवर बेकायदेशीर जमाव जमवून अतिक्रमण करणे, जागेवरील बोर्ड तोडून नुकसान करणे तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्री. अरुण वैगुनाथ खराडे पाटील, प्रसाद अरुण खर्डे पाटील आणि इतर ४० ते ५० अनोळखी इसमांवर भारतीय न्याय संहिता व भा.दं.वि. च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ​

याबाबत बांधकाम व्यावसायिक अभि विजय रोदळ (वय ३३ वर्षे, रा. मॅनहॅटन, पल्लोड फार्म, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. ​

मिळालेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी सकाळी ६:०० ते दुपारी १२:०० वाजेदरम्यान म्हाळुंगे येथील सर्व्हे नंबर ९/१० मधील फिर्यादी यांच्या जागेत आरोपींनी ४० ते ५० जणांचा बेकायदेशीर जमाव आणला. त्यानंतर फिर्यादीच्या जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण करत तेथील बोर्ड तोडून नुकसान केले. एवढेच नव्हे तर जागेच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेली सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण संगणकीय निगराणी यंत्रणा जाणीवपूर्वक नष्ट करून इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुरासे व पोलीस निरीक्षक ठाकूर पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button