Uncategorized

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते प्रतिमापूजन; महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती

​पिंपरी, दि. २ ऑक्टोबर (प्रतिनिधी):सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच ‘जय जवान, जय किसान’चा नारा देऊन देशवासीयांमध्ये नवा उत्साह भरणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही महापुरुषांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

​पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या दोन्ही थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.​

या प्रसंगी महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सत्तेविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन आणि ‘असहकार चळवळ’ यांच्या माध्यमातून लढा उभारून महात्मा गांधींनी देशातील स्वातंत्र्यसैनिकांना नवी दिशा दिली. त्यांचे सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे विचार आजही संपूर्ण मानवजातीसाठी दिशादर्शक आहेत. तर दुसरीकडे, संपूर्ण देशाचे पाठबळ सैन्यदलाच्या पाठीशी ठामपणे उभे करणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांनी मुत्सद्दी राजकारण आणि प्रखर देशभक्तीचा आदर्श उभा केला. दोन्ही महापुरुषांचे विचार आणि कार्य राष्ट्रनिर्मितीसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत यावेळी भावना व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button