Uncategorized

थेरगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

९० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २८ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या अतुलनीय त्याग आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी थेरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील निलंगेकर व रविकिरण घटकार यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरास पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या मराठवाडामधील नागरिकांचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ९० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.​

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार तसेच नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन उपस्थित होते. यावेळी मराठवाड्याच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि यशाची ऐतिहासिक गाथा मांडत, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या मराठवाड्यातील युवकांनी संघटित होऊन समाजकार्यात नेहमी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.​

या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय व सामाजिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ग्लोबल मराठा एक्सपोचे शहराध्यक्ष अर्जुन खामकर, व्यावसायिक दिलीप कुलकर्णी, पवार साहेब, जय हनुमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गायके, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, शिवसेना नेते हरेश नखाते, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, शिवसेना महिला आघाडी संघटिका अनिताताई पांचाळ, उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, समन्वयक श्रीमंत गिरी यांचा समावेश होता.​

तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निखिल साकळे, छावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादाभाऊ पाटील, छावा मराठा महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई पाटील, युवा नेते हनुमंत पिसाळ, उद्योजक नवनाथ जाधव, अक्षय घटकार, चंद्रकांत उंबरे, कामगार नेते परमेश्वर कुंभार, प्रा. शैलेश झरकर, आशिष पाटील, महाराष्ट्र आयटी सेनेचे अनिल ओझा आणि प्रकाश महल्ले आदी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button