चोहोलीत लाचलुचपत विभागाचा मोठा विळखा; ७० हजारांची लाच घेताना तलाठी आणि एजंट एसीबीच्या जाळ्यात!
दिघी (पुणे) प्रतिनिधी दि.९ :जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चोहोली बुद्रुक येथील तलाठ्याला आणि त्याच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.
या धडक कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.वारस नोंदीसाठी मागितली लाचयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीमती शैलजा शशिकांत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचखोर आरोपींची नावे:१) सुनिल भिकाजी सातोसे (वय ४४) – पद: तलाठी (ग्राम महसूल अधिकारी, वर्ग-३), नेमणूक: चोहोली बुद्रुक तलाठी कार्यालय (रा. वाकड, पुणे).२) नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०, खाजगी एजंट) – (रा. चोहोली खुर्द, मूळ ता. अर्धापूर, जि. नांदेड).’
एसीबी’चा सापळा यशस्वी
तक्रारदाराच्या आजोबांच्या वडीलोपार्जित जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी आरोपी तलाठी सुनील सातोसे याने सुरुवातीला १,८०,०००/- रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ७०,०००/- रुपये देण्याचे ठरले. दि. ०८/०६/२०२६ रोजी दुपारी १५:०० ते १५:१३ च्या दरम्यान, ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात (तलाठी कार्यालय) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सातोसेच्या सांगण्यावरून खाजगी एजंट नेमाजी भोकरे याने तक्रारदाराकडून ७०,०००/- रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (सपोआ) निता मिसाळ करत आहेत.