Uncategorized

मालवंडी जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या सुजाता डोईफोडे यांचा दणदणीत विजय…….

सोलापूर, बार्शी, प्रतिनिधी ता.१० फेब्रुवारी २०२६ :मालवंडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुजाता डोईफोडे यांनी १० हजार २७५ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे मालवंडी गटात भाजपाचे वर्चस्व अधिक भक्कम झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.मतमोजणीदरम्यान पहिल्याच फेरीपासून सुजाता डोईफोडे यांनी आघाडी घेतली होती. विकासकामांचा ठोस अजेंडा, जनतेशी थेट संवाद आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर त्यांनी हा विजय संपादन केल्याचे बोलले जात आहे.विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुजाता डोईफोडे यांनी मतदारांचे आभार मानत, “मालवंडी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू,” असा विश्वास व्यक्त केला.या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपाला मोठे बळ मिळाले असून विरोधी पक्षांना हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button