Uncategorized

५ व्या इंडिया इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान….

पिंपरी प्रतिनिधी, दि. १० फेब्रुवारी २०२६ : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ व्या इंडिया इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.दिल्ली येथे नुकतीच ५ वी इंडिया इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील १४ वर्षाखालील ३७ किलो वजन गटात अधिराज शेंडगे याने सुवर्णपदक पटकावले. तर १४ वर्षाखालील ३२ किलो गटात वैष्णवी खत्रावात हिने सुवर्णपदक व सिद्धी हुंबे हिने रौप्य व कांस्य पदक मिळवले. याशिवाय १५ वर्षाखालील ४२ किलो गटात शंतनू गौर याने रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. तर १४ वर्षाखालील २८ किलो गटात रियन बुर्डे याने रौप्यपदक पटकावले. १९ वर्ष वयोगटातील ५४ किलो गटात दर्शन तांबोळकर याने कांस्यपदक मिळवले.

Oplus_19005472

महापौर रवि लांडगे यांनी यासर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना रविभाऊ लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशन नियुद्ध कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन संस्थेचे संस्थापक प्रकाश बोईनवाड, उपाध्यक्ष विकास डेंगळे, कार्याध्यक्ष रविंद्र लबडे आणि सचिव सचिन आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रवीण नाईकडे, संदेश साकोरे, महेश पडवळ, प्रणव सकुंडे आणि दिव्या वर्पे यांनी प्रशिक्षक म्हणून विशेष परिश्रम घेतले.कै.पै.मारूती (नाना) कंद स्पोर्ट्स फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button