नाशिक फाटा येथे दुकानदाराला मारहाण करत सोनसाखळीची जबरी चोरी; दोन आरोपी जेरबंद

भोसरी प्रतिनिधी दि. ८ : कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरात एका दुकानदाराला जबरदस्तीने मारहाण करून सोन्याची चैन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.आरोपींची नावे: १) रिषभसिंग संतोषकुमार सिंग (वय २७, रा. तळवडे), २) लवकुश हरीगेन सिंग (वय २६, रा. बिजलीनगर, चिंचवड).
घटना: फिर्यादी प्रविण कुवरपाल शर्मा (वय ४६, रा. पुनावळे, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचे ‘रोल हाऊस’ नावाचे दुकान भाड्याने घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली, त्यांचे टी-शर्ट फाडले आणि गळ्यातील १.५ तोळ्याची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ₹ २,२५,०००) जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत “व्यवसाय करू देणार नाही, हातपाय तोडून टाकू” अशी धमकी दिली.तपास अधिकारी: पोउपनि पाबळे पुढील तपास करत आहेत.