Uncategorized

कंत्राटी कामगारांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करा.

बोनस, ग्रॅच्युइटी आणि ‘समान काम, समान वेतना’साठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!

पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. ५ : कंत्राटी, कायम आणि हंगामी कामगारांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्या आणि कंत्राटदारांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने आता थेट आरपारची लढाई छेडली आहे. संत तुकाराम नगर, पिंपरी येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभागृहात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भव्य कामगार मेळाव्यात कामगारांच्या हक्कांवरून प्रशासनाला जोरदार इशारा देण्यात आला.​

मेळाव्याला मार्गदर्शन करताना यशवंतभाऊ भोसले यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर आणि मनमानी करणाऱ्या कंत्राटदारांवर जोरदार तोफ डागली. “स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवून दिलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कामगारांना वेतन न देता त्यांचे शोषण करणाऱ्या मुजोर कंत्राटदारांवर तातडीने कठोर कारवाई करा आणि कामगारांना कायदेशीर वेतन मिळवून द्या,” असा घणाघात त्यांनी केला.

​मेळाव्यातील प्रमुख मागण्या आणि इशारे:​

• सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा तसेच सेवानिवृत्त कंत्राटी कामगारांना नियमानुसार ग्रॅच्युइटी व बोनस तातडीने अदा करावा.​•समान काम, समान वेतन: राज्यातील सर्व महापालिकांमधील कंत्राटी कामगारांना परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच कायदेशीररीत्या ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्यात यावे.​५ लाखांचे आरोग्य कवच: अहोरात्र राबणाऱ्या सफाई कर्मचारी व नर्सेसना कुटुंबीयांसह ५ लाख रुपयांची सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी लागू करावी.​कामगारांना स्वतःचे हक्काचे घर: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येक कंत्राटी कामगाराला ४५० चौरस फुटांचे हक्काचे पक्के घर उपलब्ध करून द्यावे.​आरोग्य व सुरक्षा उपकरणांची सक्ती: औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय (DISH) आणि एनजीटीच्या (NGT) नियमांनुसार कामगारांना सुरक्षेची साधने देणे बंधनकारक करावे; तसेच वर्षातून दोन वेळा सर्व कामगारांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार व्हावेत.​

अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच निर्णायक बैठक पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासनाला सविस्तर निवेदन दिले जाणार आहे. या सर्व मागण्यांच्या तातडीने पूर्ततेसाठी अपर कामगार आयुक्त (पुणे) श्री. अभय गीते यांच्यासोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी स्पष्ट केले.​

कामगारांच्या हक्कांवर गदा आणल्यास संघटना शांत बसणार नसून रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्याचा इशाराही या मेळाव्यात देण्यात आला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कंत्राटी, कायम व हंगामी कामगार, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button