Uncategorized

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सीमावर्ती भागातील शाळांचा सन्मान

भोसरी प्रतिनिधी | दि. १२मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पुणे आणि शारदा प्रतिष्ठान, भालकी (जि. बिदर) यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये ऐतिहासिक व ज्ञानवर्धक उपक्रम उत्साहात पार पडला.“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा…!” या ब्रीदवाक्याला साजेसा कार्यक्रम आयोजित करून सीमावर्ती भागात मराठी भाषा जपण्यासाठी कार्य करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले.

सीमावर्ती गावांमध्ये मराठी भाषा टिकवण्यासाठी काम करणाऱ्या शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी शाळांना पुढील ग्रंथ व शैक्षणिक साहित्य देण्यात आले –भारताचे संविधान – लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठीज्ञानेश्वरी

मराठी साहित्याचा आध्यात्मिक वारसा जपण्यासाठीसंत तुकाराम महाराज गाथा – अभंगातून संस्कार रुजवण्यासाठीविद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यमराठी ही आपली मायबोली असून ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता सीमावर्ती भागातही जिवंत ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमासाठी श्री. अरुण श्रीपती पवार (संस्थापक-अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. दिनकर मोरे (विश्वस्त, शारदा प्रतिष्ठान, भालकी) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, श्री. सूर्यकांत कुरुलकर, श्री. दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, श्री. सुधाकर थिटे, श्री. किशोर अट्टरगेकर, श्री. तुकाराम नारायणराव मोरे, श्री. हरिदेव रुद्रमणी, श्री. तुकाराम शेडोळे, श्री. अमृत अक्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन व उपस्थित मराठीप्रेमींचे आयोजकांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button