भोसरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! फसवणूक करून चोरलेली सोन्याची चैन चोरांकडून मिळवली : आरोपींना पकडले

सोन्याच्या बिस्किटांचे अमिश दाखवून महिलेकडून सोन्याची चैन घेऊन केली फसवणूक : भोसरी पोलिसांनी चोरांना पकडले
भोसरी प्रतिनिधी दिनांक ११ : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. फसवणूक करून एका महिलेची बळकावलेली सोन्याची चैन परत मिळवली. यासंदर्भात घडलेली घटना अशी की दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी २.३० च्या सुमारास एक महिला भोसरी ब्रीजवळ संविधान चौकातील रूपलक्ष्मी ज्वेलर्स येथे खरेदी करीत असताना तिच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. संबंधित महिलेला ओळख वाढवून सांगितले की, आमच्याकडे दोन सोन्याची बिस्किटे आहेत. ती दोन सैन्याची बिस्किटे आम्ही तुम्हाला देतो त्या बदल्यात तुमच्याकडील सोन्याची चैन आम्हाला द्या असे सांगून विश्वास संपादन केला. त्याप्रमाणे सोने सदृश्य बिस्किटे आणि सोन्याची चैन अदलाबदल करून फसवणूक केली.
आपली फसवणूक झाली हे कळताच सदर महिलेने भोसरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. या संदर्भात तपास करीत असताना तपास साह्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे, पोलिस उप निरीक्षक अमित लबडे आणि त्यांच्या स्टाफ ने तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेतला. यामध्ये आरोपी प्रकाश रमेश गायकवाड, वय ४५ वर्ष, राहणार सलगरा बुद्रुक, तालुका जिल्हा लातूर. पोलिसांनी मोठ्या च्यातुर्याने सापळा रचून आरोपीला पकडून ७ मार्च रोजी अटक केले. फसवणूक करून हस्तगत केलेली त्याच्याकडील सोन्याची चैन परत मिळवली.भोसरी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास साह्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे ,PSI सुहास खाडे, var अमित लबडे, Asi Boyne, HC mane,more, pc salve, डेरे, vatkar, garudkar,garol यांनी हि उत्तम कामगिरी केली सर्व सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आपले भोसरी पोलीस कार्यतत्पर काम करत आसल्याची भावना नागरिकांन मध्ये ऐकायला मिळत आहे