Uncategorized

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर गोपाळ सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

तरुण नेतृत्वाला संधी; अभिनंदन बैठकीत उत्साहाचे वातावरण

| प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड, दिनांक १६ :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सागर गोपाळ सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ही निवड दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्हा अध्यक्षांच्या अधिकृत पत्राद्वारे घोषित करण्यात आली.या निवडीवेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्ठीवकर, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर आणि राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली.तसेच संस्थापक व माजी अध्यक्ष अनिल वडघुले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी बढती करण्यात आली आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी दिनांक १६ मार्च रोजी पिंपरी येथे आयोजित अभिनंदन बैठकीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या बैठकीत उपस्थित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करत सूर्यवंशी यांच्या निवडीचे स्वागत केले.मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने ती बरखास्त करण्यात आली असून, नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी दिली.गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या सागर सूर्यवंशी यांनी सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, विविध समस्यांवर पाठपुरावा करणे आणि समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविणे यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.यावेळी बोलताना सूर्यवंशी यांनी सांगितले की, पत्रकारांचे प्रश्न सोडविणे, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, पत्रकारांसाठी घरकुल, आरोग्य विमा आणि पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून संघटनेला अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल.या बैठकीस पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button