Uncategorized

हिप्परगा रवा श्री नृसिंह यात्रे निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी | एच आर न्यूज मराठी

हिप्परगा रवा १६ :लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री नृसिंह यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीही हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच 18/3/2026 रोजी प्रसिद्ध समाजप्रबोधन करुन अनेक तरुणांना स्फूर्ती देणारे किर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणकर यांचे श्रुश्राव्य किर्तन संध्याकाळी 9 ते 11 आयोजित केले आहे श्री नृसिंह केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ मार्च रोजी दुपारी श्रींचे भव्य मिरवणूक होणार आहे. रात्री दहा वाजता शिवकरवाडी येथून श्रीच्या घोड्याचीवाजत गाजत हिप्परगा (रवा) येथे मिरवणूक येते.

त्यानंतर सर्व ग्रामस्थाना शेतकरी कष्टकरी कामगाराना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन एक दिवस मोकळेपणाने आनंद घेण्यासाठी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा डीजे शो होणार आहे. दि. २० मार्च रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री श्री चा छबिना व शोभेच्या दारूची भव्य आतषबाजी होणार आहे. त्यानंतर यावर्षी प्रथमच दि. २१ मार्च रोजी श्री नृसिंह केसरी २०२६ कुस्ती स्पर्धा होणार आहे. रात्री 9 वाजता लावणी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या लावणी स्पर्धेचे पहिले बक्षीस एक लाख रुपये व दुसरे बक्षीस ५१ हजार रुपये व तिसरे बक्षीस एकतीस हजार असे आहे. हिप्परगा (रवा) ग्रामस्थांच्या वतीने या यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभघ्यावा, सर्व पंचक्रोशीतील महिला व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button