Uncategorized

मालमत्ता कर ‘अभय योजना’ला मुदतवाढ द्या; अरुण पवार यांची आयुक्त व लोकप्रतिनिधींना मागणी

नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत योजना सुरू ठेवण्याची विनंती

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) ८ – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून थकीत मालमत्ता करधारकांसाठी राबविण्यात आलेली ‘अभय योजना’ ३१ मार्च रोजी संपुष्टात आली असली, तरी अनेक नागरिक तांत्रिक अडचणी व आर्थिक कारणांमुळे या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत.

त्यामुळे ही योजना आणखी एक महिना म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी समाजभूषण पुरस्कार प्राप्त अरुण श्रीपती पवार यांनी केली आहे.शहरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पवार यांनी महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

यामध्ये आयुक्त तथा प्रशासक, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि महापौर रवी लांडगे यांच्याकडे त्यांनी विशेष मागणी नोंदवली आहे.मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक वर्षअखेरची धावपळ, तांत्रिक अडचणी आणि आर्थिक नियोजनाचा अभाव यामुळे अनेक इच्छुक नागरिकांना वेळेत कर भरता आला नाही, असे पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.तसेच, अनेक नागरिक अद्याप कर भरण्यास इच्छुक असून, योजनेला मुदतवाढ दिल्यास मोठ्या प्रमाणात महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईतून दिलासा मिळेल आणि त्यांना आर्थिक आधारही मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“जनहित आणि महापालिकेचा वाढता महसूल या दोन्ही बाबींचा विचार करता ‘अभय योजना’ ३० एप्रिलपर्यंत वाढवणे अत्यंत गरजेचे आहे,”

अशी आग्रही भूमिका अरुण पवार यांनी मांडली आहे.दरम्यान, या मागणीवर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात, याकडे शहरातील करदात्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button