Uncategorized

बातमी बाणेरमध्ये भरदिवसा घरफोडी; ३ लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

उत्तर प्रदेशातील चोरट्याला हिंजवडी/बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बाणेर/पुणे प्रतिनिधी दि. १४ :बाणेर येथील मोहननगर परिसरातील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अनिल मिस्त्री राजभर (वय ४० वर्षे, रा. ग्राम पो. भोदरी, ता. किराकत, जि. जौनपूर, राज्य- उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राज संजय शेटे (वय २८ वर्षे, रा. कोयना अपार्टमेंट, मोहननगर, बाणेर, पुणे) यांनी बावधन पोलीस चौकीत (हिंजवडी पोलीस ठाणे) फिर्याद दिली आहे.

भरदिवसा घरफोडी

पोलीस माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ७:३० च्या दरम्यान फिर्यादी प्राज शेटे यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी अनिल राजभर याने अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

३ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल लंपास

घरात बेकायदेशीर प्रवेश करून आरोपीने कपाटातील ३,०६,००० रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे टॉप्स, आणि ८,००० रुपयांची रोख रक्कम व मनगटी घड्याळ असा ऐवज चोरून नेला. फिर्यादी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button