“जूनअखेर पावसाची दमदार एंट्री! उकाड्याला ब्रेक, शहरवासीयांना दिलासा”

“काळ्या ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट अन् पावसाच्या सरींनी शहराला झोडपलं”
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | HR News मराठी
जून महिन्याच्या अखेरीस अखेर पावसाने जोरदार हजेरी लावत शहरवासीयांना मोठा दिलासा दिला आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी अचानक काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही भागात मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मात्र, पावसाच्या आगमनासोबतच काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. झाडांच्या फांद्या वाऱ्यामुळे डोलू लागल्या तर विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी वर्गासाठीही हा पाऊस दिलासादायक मानला जात असून खरीप हंगामातील पिकांना याचा फायदा होणार आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.