Uncategorized

भोसरीत खळबळ!

अल्पवयीन मुलाकडे सापडले गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतूस

भोसरी प्रतिनिधी दि. २८ : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती एक धक्कादायक प्रकार लागला आहे.

क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला (विधीसंघर्षित बालक) ताब्यात घेतले.​जप्त मुद्देमाल: ४०,५००/- रुपये किमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १ जिवंत राऊंड.​

कारवाई: पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या मुलावर भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button