Uncategorized

देहूफाट्यावर राडा!

देहूफाट्यावर राडा! “मागे बघून थुंक” म्हटल्याचा राग, ट्रॅक्टर चालकाकडून तरुणाच्या डोक्यात दगड अन् हेल्मेटने जीवघेणा हल्ला!

दिघी (HR News मराठी): रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे एका उद्दाम ट्रॅक्टर चालकाने आपल्या साथीदारांसह मिळून दोन सख्ख्या भावांना हेल्मेट आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना देहूफाटा ते आळंदी रस्ता परिसरात घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी “पुन्हा इथे दिसलात तर अंगावर गाडी घालून जिवंत मारीन,” अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​

याप्रकरणी स्वप्नील शिवाजी राठोड (वय २८ वर्षे, रा. सोपान जाई पार्क, आळंदी, ता. खेड, मूळ रा. जवळा, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आरोपी नना सिताराम बारेला (वय ३२ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, मावळ, जि. पुणे) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​नेमकी घटना काय घडली?

​दि. ३ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी स्वप्नील राठोड हे देहूफाटा चौकातील पी.एम.पी.एम.एल बसस्टॉपजवळ आले होते. याच वेळी डाव्या बाजूने आळंदीकडे वळण घेणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या चालकाने (नना बारेला) स्वप्नील यांच्या अंगावर थुंकले.​स्वप्नील यांनी त्याला “मागे नीट बघून थुंक ना,” असे म्हटले. याचा प्रचंड राग अनावर झालेल्या ट्रॅक्टर चालकाने त्याचा ट्रॅक्टर स्वप्नील यांच्या गाडीला कट मारून आडवा लावला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.​

हेल्मेट अन् दगडाने डोके फोडले!​

वाद एवढा वाढला की, ट्रॅक्टर चालक नना बारेला याने स्वतःच्या डोक्यातील हेल्मेट काढले आणि ते स्वप्नील यांच्या तोंडावर जोरात मारले. एवढ्यावरच न थांबता, रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड उचलून त्याने स्वप्नील यांच्या डोक्यात घातला, ज्यामुळे स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडले.

​यावेळी स्वप्नील यांचे भाऊ सौरभ हे त्यांना वाचवण्यासाठी धावले असता, आरोपीच्या इतर दोन साथीदारांनी सौरभ यांना धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी “परत तुम्ही कुठे भेटलात तर तुमच्या अंगावर गाडी घालून जिवंत मारीन,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला.​

दिघी पोलिसांत गुन्हा दाखल

​याप्रकरणी दिघी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भादंविच्या विविध कलमांन्वये (कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) व इतर) गुन्हा नोंदवला आहे. रस्त्यावरील किरकोळ वादातून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुंडांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

​या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोउपनि) भोईर करत आहेत.​तपास अधिकारी संपर्क: मपोउपनि भोईर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button