लोहारा पोलीस ॲक्शन मोडवर; हिप्परगा रवा येथील दारू विक्रेत्यावर धडक कारवाई

बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात पोलिसांचा कडक इशारा
लोहारा प्रतिनिधी , दि. २६ : लोहारा पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत असून, हिप्परगा रवा येथे बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली असून संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा लोहारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
1) पोलीस स्टेशनचे नाव – पो.स्टे. लोहारा
2) गु. रं. नं. व कलम – 60/2026 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.
3) फिर्यादीचे नाव व पत्ता -निरंजन रघुनाथ फुलमाळी वय 34 वर्षे पोकॉ 1628 व्यवसाय – नौकरी नेमणुक पोलिस ठाणे लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव
4) गु. घडला ता. वेळ व ठिकाण – दि 25.03.2026 रोजी 18.40 वा. मौजे हिप्परगा रवा येथील बालाजी महादेव मोरे यांचे घरासमोरील किराणा दुकानात.
5) गु.घ. दाखल तारीख वेळ- दिनांक 25.03.2026 रोजी 21.08 वा.
6) आरोपी नाव व पत्ता – बालाजी महादेव मोरे वय 64 वर्ष ता. हिपरगा रवा ता लोहारा जि. धाराशिव .
7) आरोपी अटक ता वेळ – निरंक.
8) मिळाला माल – 1) 1100.00 एक लाल रंगाच्या पिशवीमध्ये देशी दारु स्पेशल संत्रा कंपनीच्या 180 एम. एल. च्या एकूण 11 सिलबंद काचेच्या बाटल्या प्रती बाटलीनागरिकांनीही बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.