‘HR News मराठी’च्या बातमीचा जोरदार तडाखा!

हिप्परगा (रवा) वीजबिल वाटपातील बेजबाबदारपणावर महावितरणचा मोठा चाबूक; ‘स्वानंद सेल्स’ एजन्सीला ३ दिवसांत कारवाईचा अंतिम इशारा!
लोहारा (विशेष प्रतिनिधी) दि. २८ : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या मक्तेदार आणि कर्मचाऱ्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत. हिप्परगा (रवा) येथे वेळेवर वीजबिले न वाटता ग्राहकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप देणाऱ्या ‘स्वानंद सेल्स अँड सर्व्हिसेस’ या रीडिंग एजन्सीचा मनमानी कारभार **’HR News मराठी’**ने चव्हाट्यावर आणला होता. या वृत्ताची थेट दखल घेत महावितरण लोहारा उपविभागाने संबंधित एजन्सीला अधिकृत नोटीस (जा.क्र. ६४६) बजावत ३ दिवसांची अंतिम मुदत दिली असून, थेट दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
’HR News मराठी’ने लावून धरला जनतेचा प्रश्न हिप्परगा (रवा) परिसरात ग्राहकांना नियमित आणि वेळेत वीजबिले मिळत नव्हती. परिणामी चालू बिल, थकबाकी, अंतिम तारीख याची कोणतीही पूर्वकल्पना न मिळाल्याने ग्राहकांना नाहक विलंब शुल्क भरावे लागत होते, तर काहींचे वीज कनेक्शन खंडित होण्याची टांगती तलवार निर्माण झाली होती. नागरिकांच्या या संतापाला ‘HR News मराठी’ ने २४ ऑगस्ट रोजी प्रमुख मथळ्यासह सडेतोड वाचा फोडली.
महावितरणचे थेट व कडक आदेश: प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत उपकार्यकारी अभियंता (महावितरण उपविभाग, लोहारा) यांनी तात्काळ आक्रमक पाऊल उचलले. पत्राद्वारे एजन्सीला खालीलप्रमाणे कडक निर्देश देण्यात आले आहेत:प्रतिमेला धक्का: एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महावितरणच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे.वारंवार दुर्लक्ष: वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही बिल वाटपाच्या कार्यपद्धतीत सुधारणा का झाली नाही? यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला.कर्मचाऱ्यांची यादी सादर करा: लोहारा उपविभागात गावनिहाय बिले वाटप करणाऱ्या सर्व व्यक्तींची/कर्मचाऱ्यांची संपूर्ण नावे आणि मोबाईल क्रमांक तात्काळ कार्यालयाला द्यावेत.पारदर्शकतेचा जाब: यापुढे एकाही गावात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी काय ठोस उपाययोजना केल्या, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
३ दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा दंडात्मक कारवाई अटळ!”
या प्रकरणाचा लेखी खुलासा ३ दिवसांच्या आत सादर करावा; अन्यथा आपले काम असमाधानकारक असल्याचे घोषित करून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा सक्त इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे. या कारवाईची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडेही (तुळजापूर विभाग) पाठवण्यात आली आहे.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे जनतेला मिळाला न्याय ‘HR News मराठी’च्या दणक्यानंतर महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या तडफेमुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत असून, जनतेचा आवाज बनून हा प्रश्न तडीस नेल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी HR News मराठी’ चे आभार मानले आहेत.