Uncategorized

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!

रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद; महापौर रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी-चिंचवड (एच आर न्यूज मराठी ) दि. १४ : पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांच्या हक्काची आणि विश्वासाची संस्था असलेल्या ‘पिंपरी चिंचवड महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेचा’ ५४ वा वर्धापन दिन सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि सभासदांसाठी अल्पोपहार व चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सभासदांनी उदंड प्रतिसाद दिला.​

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन​ सामाजिक भान जपत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक मा. महापौर रविभाऊ लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिराला महापालिका कर्मचाऱ्यांनी व रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला. वर्धापन दिनानिमित्त संचालक मंडळाची एक अत्यंत महत्त्वाची सभाही यावेळी पार पडली.​

संस्थेच्या प्रगतीचा आढावा ​कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी पतसंस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीची आणि प्रगतीची सविस्तर माहिती दिली. संस्थेने राबवलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे आणि पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा पतसंस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.​

मान्यवरांची मांदियाळी

​या ऐतिहासिक सोहळ्याला पतसंस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संचालक आणि सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:​चेअरमन: शिवाजी येळवंडे​,व्हाईस चेअरमन: ज्ञानेश्वर शिंदे​,सेक्रेटरी: विश्वनाथ लांडगे​,खजिनदार: अभिषेक फुगे​संचालक व सल्लागार मंडळ: सनी कदम, नाथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, अनिल लखन, विजया कांबळे, कृष्णा पारगे, संदीप कापसे, योगेश रानवडे, विजय मुढे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, पगडीवाले तसेच सल्लागार मनोज माचरे, महादेव बोत्रे, दिगंबर चिंचवडे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सूरज टिंगरे, दत्ता ढगे, मदन चिंचोळे, किसन आरजे, प्रमोद अंबपकर, सुहास दाखवले, भाऊसाहेब शेलार, किशोर आठवण, गौतम पायाळ, राकेश भालेराव, चव्हाण सर आणि संस्थेच्या माजी चेअरमन चारुशीला जोशी व नितीन सामगीर आदी मान्यवर उपस्थित होते.​

सभासदांकडून सुधारित कामकाजाचे कौतुक​

दिवसभरात महापालिकेच्या हजारो सभासदांनी पतसंस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेने सभासदांच्या हितासाठी सुरू केलेल्या सुधारित आणि डिजिटल कामकाजाचे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी व सभासदांनी तोंडभरून कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button