Uncategorized

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून संत तुकाराम नगरमध्ये ऐतिहासिक सीमोल्लंघन व सोन्याची लुट.

माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (विशेष प्रतिनिधी) प्रतिनिधी दि. २० : विजयादशमी आणि दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात पारंपरिक सीमोल्लंघन, भव्य पथसंचलन आणि सोनं लुटण्याचा अपूर्व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा आदर्श संदेश देण्यात आला.​

पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली व पथसंचलन राष्ट्रीय श्रमिक आघाडी व संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम नगर येथील श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून झाली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेल्या रॅलीदरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यास, स्वामींच्या मंदिरात तसेच बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गंगानगर ते अक्षय सोसायटी (वायसीएमएच परिसर) मार्गावर माजी नगरसेवक बबनराव गाढवे, भाजप नेते किरण सुवर्णा, मंगेश धाडगे, नंदूआप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, शेखर पाटील, संदीप नाईक आदींनी अमर साबळे व यशवंतभाऊ भोसले यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले.​

सीमाभागातील गणेश मंदिरात पारंपरिक ‘सोनं लुटणे’ वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवर वसलेल्या श्री गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा मुख्य सोहळा पार पडला. दोन्ही परिसरांतील शेकडो नागरिकांनी एकत्र येत भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले आणि एकमेकांना आपट्याची पाने (सोनं) वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यशवंतभाऊ भोसले यांची ६ वर्षांची नात लिनेशा हिनेही पथसंचलन आणि सोनं लुटण्याच्या या परंपरेत उत्साहाने सहभाग घेतला, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.​

सांस्कृतिक परंपरेचे पुनरुज्जीवन: अमर साबळे या प्रसंगी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले, “विजयादशमी ही दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून विजयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देते. यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीच्या दिंडीनंतर आता सीमोल्लंघनाची ही पुरातन परंपरा सुरू करून सामाजिक एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या भागाच्या सांस्कृतिक इतिहासात या उपक्रमाची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल.”

​ऐतिहासिक संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट: यशवंतभाऊ भोसले आपल्या मनोगतात यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमेवर एकत्र येत, गळाभेट घेत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटत असत. हीच प्रेम आणि एकोप्याची संस्कृती शहरात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या मूळ परंपरेची ओळख करून देण्यासाठी संत तुकाराम नगरमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे.”​

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले, दीपक पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे, राहुल शितोळे, अंकुश वाघमारे, अप्पू नायर, ओंकार जोकारे, मानसी देशपांडे, लताताई पाटील, चंद्रकांत भालेराव, शालनताई महापुरे, योगेंद्र आरवडे, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे, सतीश सासवडे, श्रेयस करे, विनायक निकम, जेवियर अँथनी, किसन भाग्यवंत, मल्लेष कोरवी, इस्मत सय्यद, दगडू लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदाम गायकवाड, आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश भुते, आरती पराळे, उषाताई टाकळकर, सुधाकर शिंदे, अंकुश गायकवाड, फौजदार गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रिया घोरपडे व राजनी मगर आदींसह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button