Uncategorized

पारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी…

नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे

देहूगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मार्गदर्शन मेळावा व पदवीधरांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

​देहूगाव (प्रतिनिधी) | ९ ऑगस्ट: आदिवासी पारधी समाजाला समाजात मानाचे स्थान मिळवून देणे आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवकांनी शिक्षण आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते पिल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही,” असे ठाम प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक व सामाजिक अभ्यासक धर्मपाल तंतरपाळे यांनी केले.

​आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व आदिवासी युवा विकास संघाच्या वतीने देहूगाव येथील राधाकृष्ण लॉन्स येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य मार्गदर्शन मेळावा व पदवीधरांच्या सन्मान सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

​नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन:​मुख्य उद्दिष्ट (माऊली उर्फ किसन भोसले – संयोजक): कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माऊली भोसले यांनी सांगितले की, “आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, विविध क्षेत्रांतील गुणवंत व सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन समाजातील तरुणांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजाचा विकास साधणे हेच या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.“​शिक्षणातूनच उद्धार (यशवंतराव भोसले – कामगार नेते): “समाजाची नवी पिढी आता उत्तम शिक्षण घेऊ लागली आहे. पारधी समाजातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, तलाठी आणि ग्रामसेवक यांसारख्या उच्च पदांवर अधिकारी म्हणून घडले पाहिजे. तरच समाजाचा खरा उद्धार होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.​महिलांचा विशेष सन्मान: या मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उपस्थित सर्व महिलांना वृक्ष भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.​

मान्यवरांची उपस्थिती:​या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे हे होते.​या प्रसंगी देहू नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, प्राध्यापक युवराज तिकटे, देहूगावच्या नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, प्रसिद्ध शिवव्याख्याते अनिलजी वडघुले, प्रल्हाद कांबळे, उत्तमरंगा सकटे, पत्रकार लहू आडसूळ, विशाल भोसले आणि निमंत्रक अंकुश भोसले यांनी उपस्थितांना संबोधित केले.​

उत्स्फूर्त प्रतिसाद: कार्यक्रमाला हिराज पवार, दीपक काळे, योगेश पवार, मॅनेजर भोसले, पत्रकार भीमराव बरकडे, महिला अध्यक्षा सौ. शन्नू भोसले, महिला उपाध्यक्ष सौ. शैला शिंदे, महिला संघटक सौ. शारदा काळे यांच्यासह हजारो समाजबांधव, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button