Uncategorized

मोशीतील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईत पत्र्याचे शेड उभारण्याची मागणी

महापालिका प्रशासनाला निवेदन

मोशी (विशेष प्रतिनिधी) दि. २१ : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईमध्ये भाजी-फळ विक्रेते आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मागील बाजूस पत्र्याचे मोठे शेड उभारावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर व स्थायी समिती सभापती यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.​

मंडईच्या पुढील बाजूस ज्याप्रमाणे पत्र्याचे मोठे शेड उभारण्यात आले आहे, त्याच धर्तीवर मागील बाजूसही शेड उभारून द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या मागील बाजूस शेड नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट फटका विक्रेत्यांसह ग्राहकांना बसत आहे. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल होत असल्याने दोन्ही बाजूस फरशी अथवा पेव्हर ब्लॉक बसवावेत, अशीही मागणी जोर धरत आहे.

​तसेच मंडई परिसरात दोन मोठी स्वच्छतागृहे कार्यरत असताना, वापरात नसलेले एक जुने व पडके स्वच्छतागृह तात्काळ हटवून परिसर स्वच्छ व मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.​

हे निवेदन देताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे लोकनियुक्त पथविक्रेता समिती सदस्य माऊली उर्फ किसन भोसले, महिला अध्यक्षा आशाताई वाघमारे, मार्गदर्शक युवराज भास्कर तिकटे, अध्यक्ष उत्तमराव सकटे, हर्षद चव्हाण, ओमकार काळे, महिला उपाध्यक्ष शैला शिंदे यांच्यासह मंडईतील असंख्य भाजीपाला व फळ विक्रेते उपस्थित होते. विक्रेते व ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button