Uncategorized

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत.

भारतीय जैन संघटनेच्या शाळेत रंगला भव्य चित्रकला उपक्रम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप संत तुकाराम नगरचा स्तुत्य उपक्रम; शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी (विशेष प्रतिनिधी):देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेवर आधारित भारतीय जैन संघटनेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी संत तुकाराम नगरच्या वतीने हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने विकसित, सक्षम आणि प्रगत भारताचे स्वप्न चित्रांच्या माध्यमातून कागदावर रेखाटले.​

“विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवून भारताची मान जगात उंच करावी” – यशवंतभाऊ भोसले​ याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “उद्याचा बलशाली भारत म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक पटलावर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच मोठे ध्येय बाळगले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगात एक नवी आणि सामर्थ्यशाली ओळख मिळवून दिली आहे; त्याचप्रमाणे नव्या पिढीनेही देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.” यावेळी त्यांनी विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.​

गोड खाऊचे वाटप अन् मान्यवरांकडून कौतुक​

उपक्रमादरम्यान सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू, चिवडा आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.​

कार्यक्रमादरम्यान भाजप कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा व माजी नगरसेविका सुजाताताई पालांडे तसेच शाळेचे प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक केले.​

मान्यवरांची मोठी उपस्थिती​

या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर यांच्यासह मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला खुले व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम व सकारात्मक विचार रुजविणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button