Uncategorized

सोसायटीच्या पुनर्विकासाचे सर्व पेच सुटणार!

oplus_2097152

३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला चिखलीत रंगणार भव्य प्रदर्शन व महामार्गदर्शन शिबीर

सहकार विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचा संयुक्त उपक्रम; टाऊन हॉलमध्ये तज्ज्ञांचा थेट संवाद

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २६ : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न, पुनर्विकास आणि आधुनिक व्यवस्थापनाला दिशा देण्यासाठी चिखली येथील टाऊन हॉलमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य प्रदर्शन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडणार आहे.​

प्रमुख मार्गदर्शन व परिसंवाद: कार्यक्रमाचे उद्घाटन आणि ‘सोसायटी पुनर्विकास व स्वयंपुनर्विकास’ या ज्वलंत विषयावर पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष मा. सुहास पटवर्धन हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.​

या महत्त्वाच्या विषयांवर होणार मंथन :​

१) पुनर्विकास व स्वयंपुनर्विकास: क्लस्टर डेव्हलपमेंट, कायदेशीर प्रक्रिया आणि बिल्डर विना स्वयंपुनर्विकासाचे ठोस मॉडेल.​

२) मालकी हक्क व वसुली: सोसायटी डीम्ड कन्व्हेअन्स (मानीव अभिहस्तांतरण) आणि सभासदांच्या थकीत रकमांची कायदेशीर वसुली.​

३) पर्यावरण व कचरा व्यवस्थापन: सोसायटी आवारातील STP (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प), OWC (ओला कचरा व्यवस्थापन) आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग.

​४) सुरक्षा व पायाभूत सुविधा: अद्ययावत लिफ्ट आणि फायर फायटिंग यंत्रणा, सीसीटीव्ही नेटवर्क आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर.

​५) डिजिटल प्रशासन: पदाधिकारी प्रशिक्षण, डिजिटल सोसायटी मॅनेजमेंट आणि सहकारात तरुणांचा सहभाग.

​शासकीय दालने व कंपन्यांची उत्पादने एकाच छताखाली :सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. प्रदर्शनात विविध शासकीय यंत्रणा, महापालिका विभाग तसेच कॉर्पोरेट कंपन्यांची उत्पादने व सेवांची माहिती देणारी दालने उभारली जाणार आहेत. दोन्ही दिवस वरिष्ठ शासकीय अधिकारी व कायदेतज्ज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील.​सोसायट्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या महाप्रदर्शनाचा पिंपरी-चिंचवड व परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या सोसायट्यांसमोर पुनर्विकास, घनकचरा व्यवस्थापन आणि अंतर्गत प्रशासकीय अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार आणि सर्वसामान्य सभासदांना एकाच छताखाली थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.​

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button